पाचल : गेली सात वर्ष सर्वांच्या सहकार्याने,पायी दिंडी, रिंगण सोहळा हरिपाठ, प्रवचन किर्तन असा भव्य-दिव्य सोहळा पाचल या ठिकाणी आज सायंकाळी तीन वाजल्यापासून संपन्न होत आहे.
सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनी एकत्र येऊन आध्यात्मिक, सामाजिक, उन्नती होऊन सर्वांचे कल्याण चिंतून आपला सांप्रदाय उत्तरोत्तर यशोशिखरावर गाठण्यासाठी प्रयत्नात राहणे हा या मागचा हेतू असून यासाठी माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून “श्री महागणपती मंडळ, पाचल’ या पंचक्रोशीतील मोक्याच्या ठिकाणी हा सोहळा आयोजित केला जातो.
या सोहळ्यात मृदुंगमणी ह. ब. प. अनंत पाटेकर, राघव चव्हाण, विनायक सुतार, निवृत्ती चव्हाण, गिरीश सुतार. तर गायनाचार्य म्हणून ह.ब. प. दौलत महाराज पाटेकर, संतोष महाराज चव्हाण, पुंडलिक महाराज पांचाळ, सहदेव महाराज सुतार, विठ्ठल महाराज पांचाळ, मुकुंद महाराज, संतोष कुर्णेकर, हे सर्व सन्मानित सोहळ्यात मंत्रमुग्ध होऊन भजन कीर्तन करतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 24-01-2023
