रत्नागिरी जिल्हा बँकेची मोबाईल एटीएम व्हॅन देणार प्रत्येक शाखेला भेट

0

लांजा : आपल्या खात्यातील पैसे बँकेच्या एटीएमद्वारे काढता यावेत, ही सुविधा गावातील लोकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मोबाईल एटीएम व्हॅन ही लांजा तालुक्यातील प्रत्येक शाखांना आठवड्यातून एकदा भेट देणार आहे.

HTML tutorial

याचा शुभारंभ शिपोशी गावामध्ये शनिवारी २१ जानेवारी रोजी करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ग्राहक हे संपूर्ण लांजा तालुक्यात आहेत. मात्र तालुक्याच्या ग्रामीण भागात अद्यापही बऱ्याच ठिकाणी एटीएमची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेला एक तर लांजा किंवा त्या गावात असणाऱ्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन स्लिप भरून पैसे काढावे लागतात. त्यामध्ये बऱ्याचदा त्यांची धावपळ होते. म्हणूनच ग्राहकांची होणारी धावपळ लक्षात घेऊन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची मोबाईल एटीएम व्हॅनच आता थेट ग्राहकांच्या गावात पोहोचणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या असणाऱ्या तालुक्यातील शाखेच्या ठिकाणी दिवसभर ही मोबाईल व्हॅन उभी राहणार असून याद्वारे ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्याची सोय उपलब्ध होणार आहे. यामध्ये सापुचेतळे येथे सोमवार लांजाला मंगळवार, साटवली येथे बुधवार, रिंगणेला गुरुवार, शिपोशीला शुक्रवार, भांबेडला रविवार याप्रमाणे तालुक्यातील प्रत्येक शाखेत आठवड्यातून एकदा ही मोबाईल व्हॅन याठिकाणी उपलब्ध असणार आहे. शिपोशी या ठिकाणी झालेल्या या शुभारंभप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव, महेश खामकर हे उपस्थित होते. त्याबरोबरच शिपोशी गावचे सरपंच हरेश जाधव, सालपे सरपंच कांबळे, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुभाष लाखण, शैलेश घाग, किसन जाधव, मनोज बाईंग, बँक शाखाधिकारी सावंत, तालुका अधिकारी प्रकाश जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 24-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here