दापोली : दापोली तालुक्यात काल एकूण चार रूग्णांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला. यामध्ये सडवे, साकुर्डे आणि बोरीवली येथील दोघांचा समावेश आहे. बोरीवली येथील शाळेत 28 नागरिकांना क्वारंटाईन केले आहे. मात्र बोरीवली वरचीवाडी येथे अॅम्ब्युलन्स पोहचायच्या आतच “त्या” पाॅझिटिव्ह रूग्णाने जरा बाहेर जाऊन येतो असे सांगून पलायन केले. सदर व्यक्तीचा शोध प्रशासनासह ग्रामस्थही घेत असून परिसरातील जंगलही शोधून झाल्याची माहिती दापोली प्रशासनाने दिली.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:48 AM 14-May-20
