मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जम्मूच्या नगरेटा शहरातून ‘भारत जोडो यात्रा’ सुरू झाली.
आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या यात्रेत सहभाग दर्शवला आहे. आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकरदेखील या यात्रेत सामील झाल्या. उर्मिला मातोंडकर आज सकाळी आठ वाजता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसेच समर्थकांनी उर्मिलाचं स्वागत केलं.
भारत जोडो यात्रेत उर्मिला सहभागी झाल्याने कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. आता सोशल मीडियावर उर्मिला आणि राहुल गांधींचे फोटो व्हायरल होत आहेत.
भारत जोडो यात्रेदरम्यान उर्मिला मातोंडकर म्हणाल्याा,”भारत जोडो यात्रा’ मला राजकारणापेक्षा सामाजिक वाटते.
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेत’ मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेचा येत्या 30 जानेवारीला समारोप होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 24-01-2023
