दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करताना एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : दुचाकीवर आपल्यासह तिघांना घेऊन प्रवास करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल दुचाकीचालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HTML tutorial

हा अपघात गेल्या शनिवारी (दि. २१ जानेवारी) रात्री १० वाजता तिवराट ते कोतवडे रस्त्यावर सनगरेवाडी येथे घडला. कमल मीने टमट्टा (२६, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. शिरगाव-आडी, ता. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. कमल आपल्या ताब्यातील दुचाकीने (एमएच-०८-एए-८५४३) कुमार रणबहादुर बिस्वकर्मा (२६) आणि हरीश ऊर्फ हस्तबहादूर वीरबहादूर बिस्वकर्मा (३२) या दोघांना घेऊन तिवराट ते कोतवडे असा जात होता. त्याची दुचाकी सनगरेवाडी येथे आली असता कमलचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. यात कुमार रणबहादूर बिस्वकर्मा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:05 24-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here