रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना वाहनचालकच नव्हे, तर पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधीही जबाबदार आहे, असे मत खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यात रेपोलीजवळ गेल्या गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाला. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील ९ जणांचा समावेश आहे. याबाबत खेडेकर यांनी अत्यंत कडवट शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, एखादा मोठा नेता अपघातात मरण पावला तरच प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? मुंबई-गोवा महामार्गावर एखाद्या नेत्याच्या मृत्यूची सरकार वाट पाहत आहे का? या रस्ते अपघातांना केवळ वाहनचालक जबाबदार नाहीत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १५ वर्षे सुरूच आहे. झालेले काम सदोष आहे. वळणमार्ग, सेवा रस्ते नाहीत. त्यामुळे रात्री वाहनचालकांचा गोंधळ उडतो. त्यामुळे अपघात होतात. या सर्व प्रकाराला जबाबदार असणारे, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोषी आहेत. त्यांनाच त्यासाठी जबाबदार ठरविले पाहिजे, असेही ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 24-01-2023
