रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे येथे श्री माघी गणेशोत्सव मंडळ, पाडावेवाडी यांच्यावतीने 25 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान माघी गणेशोत्सवानिमित्त जिल्हास्तरीय नमन स्पर्धा आणि विविध कार्यकमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. उद्या बुधवार 25 रोजी सकाळी 9 वा. श्रीं पतिष्ठापना, रात्रौ 10 जिल्हास्तरीय नमन स्पर्धा शुभारंभ होणार आहे.
दरम्यान सायंकाळी 7.30 ते 8.30 वा. लक्ष्मीकांतवाडी मिरजोळे यांचे भजन. त्यानंतर 9.30 वा. नमन स्पर्धेचे उद्घाटन, या शुभारंभालाच जाकादेवी नमन मंडळ, फणसवळे कोंडवाडी रत्नागिरी 26 रोजी सायंकाळी महिला मंडळ कलामंच मिरजोळे यांचे भजन, 27 रोजी सायं. 7.30 वा. वरचीवाडी मिरजोळे भजन, रात्रौ 9.30 वा. स्वयंभू श्री महालक्ष्मी नाट्यनमन मंडळ, कोतवडे व त्यानंतर रवळनाथ नमन मंडळ, लयभारी रत्नागिरी यांचे नमन. शनिवार 28 रोजी सायं. 4 वा. महिलांचे हळदीपुंकू, सायं.7.30 वा. मधलीवाडी मिरजोळे भजन, रात्रौ 9.30 वा. विश्वेश्वर नमन मंडळ, केळये ठिकवाडी, रत्नागिरी व त्यानंतर विठ्ठल रखुमाई खापरे धनावडे नमन मंडळ, बावनदी यांचे नमन. रविवार 29 रोजी सकाळी 10 वा. रक्तदान व आरोग्य शिबीर, सायं. 7.30 वा. सांब रवळनाथ भजन मंडळ, खानू यांचे भजन. रात्रौ 9.30 वा. गणेश कलामंडळ, वीरवाडी कळझोंडी नमन व त्यानंतर श्री काशिविश्वेश्वर लिंगायत नमन मंडळ, केळये सांबवाडी यांचे नमन. सोमवार 30 रोजी सायं.7.30 वा. कालिकादेवी भजन मंडळ, पाडावेवाडी भजन. रात्रौ 9.30 वा. भैरवनाथ नमन मंडळ, मौजे रानपाट नमन व त्यानंतर नवतरूण उत्कर्ष नमन मंडळ ओरी बोरवाडी, रत्नागिरी यांचे नमन. मंगळवार 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वा. सत्यनारायणाची महापुजा, दुपारी 1 ते 3 वा. महापसाद, रात्रौ 9.30 वा. मान्यवरांच्याहस्ते नमन स्पर्धेचे बक्षिसवितरण, त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यकम. बुधवार 1 जानेवारी रोजी सायं. 4 वा. श्रींची विसर्जन मिरवणूक असे कार्यकम होणार आहेत.
या कार्यकमांचा सर्व भाविक, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कालिकादेवी नाट्य कलामंच, मिरजोळे पाडावेवाडी यांनी आवाहन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:01 24-01-2023
