रत्नागिरी : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी २४ फेबृवारी १९३१ साली पतीतपावन मंदिराच्या कलशारोहणावेळी सुरु केलेला ऐतहासिक सहभोजनाचा कार्यक्रम भागोजीशेठ यांच्या २४ फेब्रुवारी १९४४ च्या निधनानंतर बंद पडला होता.
यावर्षी २४ फेब्रुवारी २०२३ रोजी तोच ऐतिहासिक सहभोजन व सहभोजनाचा कार्यक्रम सर्व १८ पगड, १२ बलुतेदार समाजांना सोबत घेवुन पुन्हा सुरु करण्यासाठी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज, पतीतपावन मंदीर संस्था यांनी पुढाकार घेतला आहे.
पत्रकार परिषद मध्ये सहभागी श्रीकृष्ण चव्हाण नाभिक समाज, दिपक राउत तेली समाज, प्रकाश उर्फ बावाशेठ साळवी ( कुंभार समाज ), अनिल पोटफोडे ( त्वष्टा कासार ) कुमार शेट्ये, उन्मेष शिंदे ( अध्यक्ष पतितपावन मंदीर ट्रस्ट ), राजन मलुष्टे ( वैश्य समाज ), रुपेंद्र शिवलकर ( अध्यक्ष भंडारी समाज ), बीटी मोरे ( कटबु समाज ) , रघुवीर शेलार ( तेली समाज जिल्हाध्यक्ष ), राजीव कीर आदी विविध समाजांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 24-01-2023