कोकणातील माणसं फणसाप्रमाणे गोड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

ठाणे : फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी रात्री केले.

HTML tutorial

कोकण ग्रामविकास मंडळाच्यावतीने सीताराम राणे यांनी ठाण्यातील शिवाईनगर येथील उन्नती मैदानात आयोजित केलेल्या मालवणी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सीताराम राणे, स्नेहलता राणे आणि हौसिंग फेडरेशनचे संचालक विनोद देसाई आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटीबद्ध असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बिकट बनलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसेच, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड एक्सेस कंट्रोल असा रस्ता बनवणार असून सिंधुदुर्गातील कोस्टल रस्त्याचेही रुंदीकरण करणार असल्याची ग्वाही दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:58 24-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here