मुंबईहून आंबे वाहतूक करणाऱ्या गाडीतून महिलेला आणणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : मुंबईहून देवूड (ता. रत्नागिरी) येथील महिलेला आणल्याप्रकरणी एका आंबे वाहून नेणार्‍या गाडीच्या चालकाला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुंबई विलेपार्ले येथून एक महिला देवूड येथे आली होती. तिने आपल्या प्रवासाची माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली. तसेच नातेवाईकांच्या गाडीतून आल्याचे पोलिसांना सांगितले. रेडझोनमधून आल्यामुळे त्या महिलेला संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. ती महिला आलेल्या गाडीचा तपास सुरु होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यातर्फे या प्रकरणाचा तपास सुरु होता. त्या चालकाचा तपास लागला असून या प्रकरणी आंबे वाहून नेणार्‍या गाडीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
1:48 PM 14-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here