राजापूर : शासनाने गोरगरीब उपाशी राहू नये म्हणून शिवभोजन थाळीचा उपक्रम सुरु केला आहे. त्यानुसार तालुक्यातील कोंड्ये येथे शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली. गोरगरीब जनतेसाठी पाच रुपयांत ही थाळी दिली जाणार आहे. ७५ थाळींना प्रशासनाने मंजुरी दिली आहे. कोंड्ये परिसरातील जनतेला याचा फायदा होणार आहे. यापूर्वी राजापूर एस.टी. आगारातील कँटीननमध्ये शिवभोजन थाळी सुरू केली आहे. कोंड्ये येथील शुभारंभप्रसंगी तहसीलदार प्रतिभा वराळे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर व सभापती विशाखा लाड व अधिकारी उपस्थित होते.
