बेकरीत काम करणाऱ्या कामगाराचा झोपेत मृत्यू

रत्नागिरी : बेकरीत काम करणाऱ्या कामगाराचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना १३ मे रोजी सकाळी घडली. बहरैजी चंद्रबळी लोधी (६५, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा. झाडगाव एमआयडीसी रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत बेकरीचे मालक हनुमान प्रसाद नर्मदेश्वर वर्मा (५२, झाडगाव, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली आहे. त्यानुसार, लोधी हा गेली १५ वर्षे वर्मा यांच्या आनंद बेकरीत कामाला व राहायला होता. मंगळवारी सायंकाळी तो पावलादी विक्री करुन रात्री ८ वाजता जेवून झोपला गेला. त्याच्यासोबत संजय गौतम हा दुसरा कामगारही बेकरीत रहात होता. बुधवारी सकाळी संजयने लोधीला हाक मारुन उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद न दिल्याने संजयने ही बाब मालक वर्मा यांना सांगितली. त्यांनी तातडीने बेकरीत येऊन लोधीला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here