74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव..

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (26 जानेवारी) 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी परिधान केली.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीनं अनेकांचे लक्ष वेधले.

नरेंद्र मोदींचा खास पेहराव

प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी खास पेहराव करतात. नरेंद्र मोदी अनेक वेळा विशिष्ट प्रदेशाचा पारंपारिक पोषाख परिधान करतात. यंदा 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी बहुरंगी राजस्थानी पगडी, क्रिम कलरचा कुर्ता, ब्लॅक जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे शूज असा पेहराव केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:57 26-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here