पक्षासाठी खडसेंचं योगदान फार मोठं, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्भाग्याची गोष्ट : नितीन गडकरी

मुंबई : विधान परिषदेची उमेदवारी मागून देखील एकनाथ खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. यामुळे एकनाथ खडसे यांना आपला राग अनावर झाला आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून ते भाजपवर तोंडसुख घेत भाजपसाठी आपण काय-काय केलं, भाजपची अवस्था अत्यंत दयनीय असताना पक्षासाठी कशा पद्धतीने काम केलं, हे सांगण्याचा खडसे प्रयत्न करत आहेत. यावरच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे यांचं भाजपसाठी फार मोठं योगदान आहे. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी फार हाल अपेष्टा सोसून पक्ष वाढीसाठी त्यांनी काम केलं आहे. पण त्यांच्यावर आता अशी वेळ येणं फार दुर्भाग्याची गोष्ट असल्याच्या भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here