चुल पेटवताना भडका उडून गंभीर भाजलेल्या महिलेचे निधन

रत्नागिरी : पावस येथील आंबा बागेतील शेत घराच्या चुलीत भडका उडून भाजून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. ही घटना ११ मे रोजी दुपारी १२.४५ वा. सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशोदा अरुण चौधरी (२६, मूळ रा.नेपाळ सध्या रा. पावस) असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. याबाबत तिचा पती अरुण टिक्काराम चौधरी (२८, मुळ रा. नेपाळ सध्या रा. पावस) याने पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानसार अरुण पत्नी यशोदासह पावस येथील एका आंबा बागेत कामानिमित्त रहात होते. २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा.सुमारास ती शेत घरात जेवण करण्यासाठी चूल पेटवत असताना चुलीत भडका उडून ती गंभीर भाजली होती. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना सोमवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पूर्णगड पोलिस करीत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here