दापोली : दापोली तालुक्यात काल एकूण चार रूग्णांचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह रुग्णांपैकी बोरीवली वरचीवाडी येथील अॅम्ब्युलन्स पोहचायच्या आतच एक कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाने जरा बाहेर जाऊन येतो असे सांगून पळ काढला होता. बुधवारी रात्री पासून त्याला शोधण्यासाठी प्रशासन कर्मचारी, पोलीस ग्रामस्थ शर्थीचे प्रयत्न करत होते. जंगल परिसरही शोधण्याचे काम सुरू होते. अखेर प्रशासन ग्रामस्थांच्या शोधकार्यास यश आले. तो पॉझिटिव्ह युवक अखेर जवळपास बारा तासांनी सापडल्याने प्रशासन व ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. जवळच असलेल्या मोबाईल टॉवरच्या खालील बाजू जवळ हा युवक गुरुवारी दुपारी १ वा.च्या सुमारास मिळून आला आहे. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात पुढील उपचाराकरिता आणले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी दिली. त्याची पुढील चौकशी दापोली पोलिस करणार असून त्या पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या रुग्णावर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. त्याच्यावर लवकर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:49 PM 14-May-20
