नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दुसरी पत्रकार परिषदेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी गरीब, शेतकरी, मजुरांसाठी घोषणा केल्या. यामध्ये फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी, प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था, मजुरांना अजून 2 महिने मोफत धान्य अशा महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. त्याशिवाय, अर्थमंत्र्यांनी वन नेशन वन रेशन कार्डची घोषणा केली. रेशन कार्डाची पोर्टेबिलीटी करणार, या माध्यमातून गोरगरीब जनता देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या वाट्याचे धान्य घेऊ शकतील, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकार 5 हजार कोटींची मदत करणार आहे. महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना अंमलात आणली जाईल, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
▪️ ग्रामीण सहकारी बँकांच्या पीक कर्जासाठी नाबार्डकडून 30 हजार कोटींचे अतिरीक्त सहाय्य, आणीबाणीची स्थिती म्हणून तातडीने सहाय्य : अर्थमंत्री
▪️ सहा ते अठरा लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न गटासाठी 70 हजार कोटींचे प्रोत्साहन, परवडणाऱ्या गृह योजनेचा मध्यमवर्ग आणि मजूर अशा दोन्ही घटकांना लाभ : अर्थमंत्री
▪️ परवडणा-या घरांसाठी मुदतवाढ, मार्च 20 ऐवजी मार्च 21 पर्यंत घरे घेता येणार, मध्यम उत्पन्न वर्गासाठी गृहखरेदीसाठी सवलत, 6-18 लाख उत्पन्न गटाच्या योजनेस मुदतवाढ, 2.5 लाख नवी कुटुंबे लाभ घेऊ शकतील : अर्थमंत्री
▪️50 लाख फिरत्या विक्रेत्यांना (फेरीवाले) पाच हजार कोटी रुपयांची सुविधा, प्रतीव्यक्ती दहा हजार रुपये मिळणार, एक महिन्यात योजना, डिजिटल पेमेंट केल्यास अधिक लाभ : अर्थमंत्री
▪️मुद्रा शिशू लोन धारकांसाठी 1500 कोटींची मदत, मुद्रा शिशू लोन अंतर्गत 50 हजारांपर्यंतचे कर्ज, मुद्रा शिशू लोनवर 2% व्याजमाफी, 1 लाख 62 हजार कोटींचे कर्जवाटप, 3 कोटी मुद्रा शिशू लोनधारकांना लाभ मिळेल : अर्थमंत्री
▪️ पीएम आवास योजना मजुरांनाही लागू होणार, शहरी गरिबांबरोबर मजुरांनाही पीएम आवास योजना, परवडेल अशी भाड्याची घरे उपलब्ध करु देणार : अर्थमंत्री
▪️ प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था व्हावी, उद्योगपती आणि राज्य सरकारांना प्रोत्साहन भत्ता देणार : अर्थमंत्रीरेशन कार्डाचीही पोर्टेबिलीटी करणार, देशात कुठल्याही दुकानात रेशन घेता येणार, वन नेशन-वन रेशन कार्ड लागू करणार : अर्थमंत्री
▪️ सर्व मजुरांना अजून 2 महिने मोफत अन्नधान्य देणार, 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो चना डाळ 8 कोटी मजुरांना देणार, यासाठी 3500 कोटी देणार : अर्थमंत्री
▪️ वन नेशन वन रेशन कार्ड, देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या वाट्याचे धान्य गरीब घेऊ शकणार : अर्थमंत्री
▪️ पुढील दोन महिने स्थलांतरित मजुरांना मोफत धान्य; 8 कोटी मजुरांना लाभ, कार्ड नसल्यासही प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला एक किलो चणाडाळ, राज्य सरकारकडे जबाबदारी: अर्थमंत्री
▪️ वेगवेगळ्या राज्यांमधील मजुरांच्या वेतनातील क्षेत्रीय असमानता काढून टाकली पाहिजे : अर्थमंत्री
▪️ स्थलांतरित मजूर आणि इतरांची काळजी घेण्यासाठी राज्यांना 11,000 कोटी रुपये दिले : अर्थमंत्री
▪️ 2.33 कोटी मजुरांना मनरेगाचे काम, 40 ते 50% मजुरांकडून नोंदणी, गावी गेल्यावरही मजुरांनी नोंदणी करावी, मजुरांना रोज 182 ऐवजी 202 रु. रोजगार मिळेल : अर्थमंत्री
