नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या या संकटात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यापूर्वी राष्ट्राध्यक्ष कोविंद यांनी मार्च महिन्याचा संपूर्ण पगार पंतप्रधान केयर्स फंडात दान केला होता. तसंच वर्षभर वेतनातील 30 टक्के रक्कम दान करतील. यासह अनेक प्रस्तावांना त्यांनी स्थगिती दिली आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी लिमोजीन कार खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थगित केला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:05 PM 14-May-20
