निवे प्रीमिअर लीग 2023 पर्व दोन चे शानदार उद्घाटन

0

देवरूख : श्री सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ मधलीवाडी निवे व रणसंग्राम क्रिकेट क्लब मधली वाडी निवे यांचे संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून निवे प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी प्रथमच लाईव्ह यू ट्यूब चे माध्यमातून या स्पर्धेचे प्रसारण करण्यात आले आहे. स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक, क्रीडाप्रेमी स्पर्धेला सतत सहकार्य करणारे परिश्रम घेणारे मंडळांचे पदाधिकारी, सदस्य यांचा शाल व श्रीफळ तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचे उद्घाटन निखिल लॉजेस्टीक चे प्रसिद्ध उद्योजक श्री सुरेश कदम, सरपंच कु.कल्याणी जोशी, माजी सरपंच श्री सुरेश रसाळ, सिद्धेश्वर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष श्री रामचंद्र कुवळेकर, उपाध्यक्ष श्री महेश माने, मुंबईचे मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ पाल्ये, सल्लागार श्री मनोहर पाल्ये, किरडूवे गावचे माझी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री प्रफुल्ल बाईत, महाराष्ट्र समविचारी मंच संगमेश्वर तालुका अध्यक्ष, फ्रेश न्युजचे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच संगमेश्वर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असो.चे सहसचिव श्री मनोहर गुरव, पोलीस पाटील शांताराम इप्ते, म.गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष लवू माने, श्री यशवंत कुवळेकर यांचे शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.

तसेच माजी सरपंच श्री प्रफुल्ल बाईत यांनी छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले. श्री सुरेश कदम उद्योजक यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणामध्ये खेळाडूना बहुमूल्य मार्गदर्शन केले. यावेळी निवे गावचे नागरिक, दिनकर विभुते, रामचंद्र जाधव, जयसिंग गुडेकर, सीताराम गोताड, दिपाली यादव, यामिनी कुवळेकर, गीतांजली पाल्ये, वैभव सुर्वे, रवींद्र राजवाडे, शाम पाल्ये, अनंत पाल्ये, संतोष माने, रवींद्र यादव क्रीडाप्रेमी, स्पर्धेतील संघ, खेळाडू,आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:14 27-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here