पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर सध्या त्याच्या वाचाळ वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. यावेळी त्यानं थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी) लक्ष्य केले असून त्यानं गंभीर टीका केली. आयसीसीनं अख्तरच्या एका वक्तव्याची खिल्ली उडवली होती. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याला चौथ्या चेंडूवर बाद करेन, असा दावा अख्तरनं केला होता. त्यावरून आयसीसीनं पाकिस्तानी गोलंदाजाची फिरकी घेतली. अख्तरला ही मस्करी आवडली नाही आणि त्यानं आयसीसीवर गंभीर आरोप केला. आयसीसी पक्षपात करत असल्याचा आरोप त्यानं केला. अख्तरनं 46 कसोटी आणि 163 वन डे साममन्यांत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 178 आणि वन डेत 247 विकेट्स घेतल्या होत्या. 2011मध्ये निवृत्ती घेणाऱ्या अख्तरनं 15 ट्वेंटी-20 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या आहेत.
