४५० इतर मागासवर्गीयांना दोन कोटींचे कर्ज वाटप

0

रत्नागिरी : इतर मागासवर्गीय पात्र व्यक्तींच्या सर्वांगीण आर्थिक व सामाजिक विकासासाठी अल्प व्याजदराने स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत गेल्या २३ वर्षांत ४५० लाभार्थ्यांना दोन कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

चालू वर्षात वैयक्तिक व्यवसायासाठी सहा लाभार्थ्यांना सहा लाख, तर सात लाभार्थ्यांना प्रत्येकी १० लाख असे ७६ लाखांचे कर्ज वाटप केले. कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना व्यवसायाला बिनव्याजी कर्ज उपलब्ध झाले आहे. मागास वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना व्यावसायात आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. १९९९ पासून हे महामंडळ कार्यरत आहे. तेव्हापासून रत्नागिरी जिल्ह्यात मंडळाच्या कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य केले जात आहे.

सध्या टीआरपी येथील सामाजिक न्यायभवनात राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कार्यालय असून, त्यांच्यामार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाख रुपयेपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा १० लाखांपर्यत कर्ज, गट कर्ज व्याज परतावा, शैक्षिणिक कर्ज व्याज परतावा योजना राबवण्यात येतात. रत्नागिरी कार्यालयातून गेल्या २३ वर्षात ४५० लाभार्थ्यांना दोन कोटींचे वाटप करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षांत सहा वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे सहा लाख, तर सात लाभार्थ्यांना प्रत्येकी १० लाखाप्रमाणे ७० लाखाचे वाटप झाले. सध्या महामंडळामार्फत व्याजाचा परतावा देण्यात येतो. यासाठी प्रत्येक महिन्यात वेळेवर हप्ता भरल्यानंतरच व्याज परताव्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 28-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here