आता तरी नाणार प्रकल्पाला परवानगी द्या : प्रमोद जठार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीडीपीच्या दहा टक्के म्हणजे २० लाख कोटींचे पॅकेज देशाला दिले आहे. अशावेळी कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पामुळे कोकणातल्या एक ते दीड लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. याचा विचार करून आता तरी सन्मानाने या प्रकल्पाला सरकारने घरात घ्यावे, अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबद्दल प्रत्येक कोकणवासीयाने विचार करण्याची गरज आहे. अर्थकारण, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, विविधता व मागणी अशा पाचही कसोट्यांवर नाणार प्रकल्प कोकणला जागतिक पातळीवर यशस्वी करण्याची क्षमता बाळगतो. पंतप्रधानांनी संपूर्ण देशाला २० लाख कोटींचे पॅकेज दिले आहे, तर दोन-तीन वर्षापूर्वी नाणार प्रकल्पातून फक्त राजापूरात चार लाख कोटी आपण आणले होते, असे जठार म्हणाले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here