केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच आता तुम्ही काहीतरी करून दाखवा; आशिष शेलारांचा सेनेला टोला

मुंबई : लॉकडाऊन-4 चे सूतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही?, असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. मुंबईला कोरोना मुक्त कधी करणार?, मुंबईला पूर्वपदावर कधी आणणार?, मुंबईकरांना मृत्यूच्या दाढेतून कधी वाचवणार? हे सांगा, असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रतिप्रश्न केले आहेत. मुंबई पुरामुळे तुंबणार नाही, याची हमी द्या! केंद्र सरकार शक्य ते करून दाखवत आहेतच. आता तुम्ही काहीतरी करून दाखवा ना! देशासाठी पॅकेज जाहीर झाल्यावर त्यातून मुंबईला कसे वेगळे काढणार?, सर्वाधिक उद्योग आणि करदाते मुंबईत असल्याने पॅकेजचा सर्वाधिक फायदा मुंबईलाच होईल! तरीसुद्धा पत्रपंडित म्हणतात की, मुंबईसाठी वेगळे पॅकेज द्या?, हे म्हणजे रोज सकाळी उचलली जीभ लावली टाळ्याला,’ असं म्हणत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here