जिल्ह्यातून झारखंडचे मजूर विशेष रेल्वेने रवाना

रत्नागिरी : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक परप्रांतीय मजूर रत्नागिरी जिल्ह्यात अडकून पडले आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर श्रमिक ट्रेनने त्यांना पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुमारे 1440 मजूर श्रमिक ट्रेनने गुरुवारी रवाना झाले. परराज्यात जाणार्‍यांची नोंदणी जिल्हा प्रशासनाकडून सुरु करण्यात आली होती. त्यानुसार झारखंडला जाण्यासाठी 1440 मजुरांनी नोंदणी केली होती. रत्नागिरीतून जाणार्‍या लोकांना छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर एकत्रित ठेवण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळी ट्रेन येणार असल्यामुळे त्यांना सायंकाळी रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एसटीतून नेण्यात आले. स्थानकावर त्यांना उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची व्यवस्था केली गेली होती. ठिकठिकाणी त्यांची मेडीकल तपासणीही केली गेली आहे. झारखंडला जाणार्‍यांमध्ये खेड तालुका 300, चिपळूण 244, गुहागर 144, रत्नागिरी 508, लांजा 73, राजापूर 58, संगमेश्वर 97 असे मजूर श्रमिक ट्रेनने आज झारखंडला रवाना झाले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:44 PM 14-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here