सागवे गोठीवरे परिसरात वणवा; 35 शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या

0

राजापूर : तालुक्यातील सागवे गोठीवरे परीसरात शनिवारी सकाळी लागलेल्या वणव्यात येथील जवळपास 35 शेतकऱ्यांच्या बागा जळाल्या असून सुमारे 30 ते 35 लाख रूपये नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.

येथील ग्रामस्थांना प्रसंगावधान राखुन काही बागायती वणव्यापासून वाचविल्या. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. वणवा कसा लागला याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शनिवारी सकाळी अंदाजे 10 वा.पासून गोठविरेच्या परसिरात मोठा वणवा लागला होता. हा वणवा गोठीवरे फाटा ते ऐरमवाडीपर्यत सुमारे 5 किमी हा वणवा पसरला असल्याने येथील शेतकऱयांच्या मोठया पमाणात नुकसान झाले आहे. या परीसरातील सुमारे 35 शेतकऱ्यांची धरती असलेली कलमे जळून खाक झाल्याची माहिती बागायतदारांनी दिली आहे. यामुळे सुमारे 30 ते 35 लाख रूपये नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. येथील काही शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न हे बागायतींवरच अवलंबून असते. बागायती वणव्यामध्ये जळून गेल्याने त्यांच्या समारे वर्षाभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शनिवारी सकाळ पासूनच गोठिवरे फाट्या पासून संपूर्ण डाव्या बाजूला आगीने रूद्र रूप धारण केले होते. ही आग तीन चार तास आधीच आग लागली असावी. पुढील दोन तीन तासात आग पाच किलोमीटर दूर वर पसरलेली पाहून लोकांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वाऱ्याच्या वेगापुढे सर्व हतबल झाले होत होते. अनेकांच्या हापूस आंब्याच्या झाडांचे आगीत नुकसान झाले. अनेकांच्या, उटी, गवताचे भारे जळुन खाक झाले. आजुबाजुच्या गावातून आगीचे लोट दिसत होते. दुपार नंतर अथक पयत्नाने आग नियंत्रणात आणण्यात गावकऱ्यांना यश आले. आग विझविण्यासाठी गावातील महिला, पुरूषांसहीत मुलांनी आटोकाट प्रयत्न केला असल्याने या परीसरातील काही बागा त्यांना वाचविण्यात यश आले आहे. शेतकऱयांनी रचून ठेवलेल्या वैरणही जळून खाक झाल्या असल्याने जनावरांच्या चारा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या वणव्यामध्ये रमाकांत मोंडे, विजय रोकडे, श्री.करंजवकर, चंद्रकांत झोरे, निलेश हळदणकर, गितेश बांबरकर, नियाक नार्वेकर, अनंत सोडये यांच्यासहीत सुमारे 35 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. लागलेला वणवा विझविण्यासाठी जगदिश रोकडे, तुकाराम ऐरम, रमाकांत मोंडेसह त्यांच्या बागेतील सर्व कामगार, अमर शिंदे, सुधाकर रोकडे यांच्यासहीत सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. गेली तीन वर्षे सतत या परीसता वणवा लागत असून हा वणवा का लागला जात आहे याचे कारण अद्याप समजू शकले नाही. रविवारी सांयकाळपर्यत पंचनामा करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 30-01-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here