संगमेश्वर : रत्नागिरीत काल गुरुवारी सायंकाळनंतर वादळी वारा, विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटाने पावसाने हजेरी लावली. रत्नागिरीत शहरासह ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दरम्यान, विजांच्या लखलखाटात सुरु झालेल्या या पावसामुळे संगमेश्वरात कळंबस्ते हाक्रवणेमध्ये अंगावर विज पडून नारायण तावडे (४५) यांचा मृत्यु झाला. मलदे वाडीतुन मजुरी करुन घरी जात असताना धरणाजवळ विज पडली व त्यामध्ये तावडे यांचा जागीच मृत्यु झाला. त्यांना संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
