लंडन : ‘बोरिस, मला तुझे नुकसान करायचे नाही, पण क्षेपणास्त्र हल्ला करून असे करण्यासाठी फक्त एक मिनीट लागेल,’ अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धापूर्वी दिली होती, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केला आहे.
बोरिस जॉन्सन २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असताना त्यांना ही धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. बोरिस म्हणाले की, युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वी मी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. तेव्हा पुतिन यांनी धमकी दिली आणि म्हणाले, बोरिस, मला तुझे नुकसान करायचे नाही, पण क्षेपणास्त्र हल्ला करून असे करण्यासाठी फक्त एक मिनीट लागेल. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियन हल्ल्यापूर्वी, बोरिस यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. यानंतरच पुतिन यांनी बोरिस यांना फोन केला होता.
खूप प्रयत्न केला पण…
जॉन्सन म्हणाले की, युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी मी पुतिन यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
युक्रेन नाटोत सामील होण्याची शक्यता नाही, असे पुतीन यांना सांगितले. युक्रेनवर आक्रमण केल्याने तुमचा थेट सामना नाटोशी होईल.
या हल्ल्यामुळे स्वतःला नाटोपासून दूर ठेवू शकणार नाही, असा इशाराही देऊन पाहिला. परंतु, पुतिन माझे म्हणणे गांभीर्याने ऐकत नव्हते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 31-01-2023
