राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यामध्ये पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा नसल्यामुळे मुंबई व कोल्हापूर यांच्यावर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आमदार डॉ. राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करणेसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, तसेच जिल्ह्यातील नागरिकांच्या रिपोर्टचे तात्काळ निदान होणे आवश्यक असल्याने, आ. साळवी यांनी कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी केली आहे.
