कोची : केरळमध्ये 28 मेपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पण काही अडचणींमुळे जास्तीत जास्त 2 दिवसांच्या अंतराने का होईना पण मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर भारतातील अन्य भागात देखील मान्सून दाखल होईल, अशी देखील शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. नैऋत्य मॉन्सूनच्या तारखांचे 1960-2019 मधील आकडेवारीच्या आधारे यावर्षी संशोधन करण्यात आले आहे. अंदमानच्या समुद्रात होणारे आगमन 20 मेच्या ऐवजी 02 दिवसांनी पुढे ढकले गेले आहे. आता ते 22 मे वर गेल्याचे देखील स्कायमेटने म्हटले आहे. तथापि, 1 जूनच्या आधी केरळमध्ये मान्सूनची सुरुवात होईल. तीन ते सात दिवसांचा उशीर देशाच्या मध्यातील बर्याच भागांमध्ये येण्यासाठी होणार आहे तर उत्तर-पश्चिम भारतामध्ये सुमारे आठवडाभर लांबणीवर पडू शकतो, असे देखील स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे.
