Breaking: देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू होणार; अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख ठळक मुद्दे

0

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

अर्थसंकल्पीय भाषणातील प्रमुख मुद्दे:

– कोरोना महासाथीच्या काळात 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप, सलग 28 महिने योजना सुरू होती. त्यानंतरही योजना सुरू आहे. दोन लाख कोटींचा खर्च करण्यात आला. पुढील वर्षभर ही योजना सुरू होणार

– कोविन अॅप, यूपीआयमुळे जगाने भारताचे महत्त्व मान्य केले.

– भारताची अर्थव्यवस्था जगातील 5 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था

– EPFO मधील खात्यांची संख्या वाढली

– 11.7 कोटी शौचालयं, उज्जवला योजनेतंर्गत 9.6 एलपीजी कनेक्शन, 102 कोटी लोकांसाठी 212 कोटी कोरोना लसी, 11.4 कोटी शेतकऱ्यांना पैशाचं थेट हस्तांतरण करण्यात आली.

– महिलांचे आर्थिक सबलीकरण, बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचा विकास

– देशातील शेतकऱ्यांसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म उभारणार

– कापसातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवण्याचे प्रयत्न

– डाळीसाठी विशेष हब तयार केलं जाणार

– पर्यावरण संवधर्नसाठी विशेष प्रयत्न

– हैदराबादच्या श्रीअन्न रिसर्च सेंटरला विशेष अनुदान देणार

– ग्रीन ग्रोथच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार

-नवीन अर्थसंकल्पात देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रस्तावही सादर करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 01-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here