राजापूर : तालुक्यात नजीकच्या काही दिवसांत शेकडो चाकरमानी दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांत तर मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. तालुक्यात आल्यानंतर खबरदारी म्हणून चाकरमान्यांचे स्वॅब घेण्यात येतात. गुरूवारी सकाळपासूनच राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या बाहेर स्वॅब नमुने देण्यासाठी सुमारे २०० ते २५० चाकरमान्यांची मोठी गर्दी झाली होती. स्वॅब नमुने देण्यासाठी आलेले चाकरमानी रूग्णालयाच्या आवारात बेशिस्तपणे फिरत होते. त्यामुळे अखेर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागला.
