गवत मारण्याचे विषारी औषध प्यायल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : गवत मारण्याचे विषारी औषध प्यायल्याने रानपाट-गोणबरेवाडी येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऑपरेशनच्या चिंतेने गवत मारण्याचे औषध खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री २.१५ वा.सुमारास मृत्यू झाला. प्रेमा प्रभाकर गोणबरे (४५, रा.रानपाट गोणबरेवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा पती प्रभाकर तुकाराम गोणबरे (५३, रा. रानपाट गोणबरेवाडी, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, प्रेमा गोणबरे हीच्या मानेवर गाठ निर्माण झाली होती. ती डॉक्टरांकडे तपासण्यासाठी गेली असता डॉक्टरांनी गाठीचे ऑपरेशन करावे लागेल असे तिला सांगितले होते. ऑपरेशनच्या चिंतेत तिने घरातील गवत मारण्याचे औषध प्राशन केले होते. ही बाब तिचे पती प्रभाकर गोणबरे यांना समजताच त्यांनी तातडीने तिला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारांदरम्यान बुधवारी मध्यरात्री तिचा मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here