आतापर्यंत एसटीतून १ लाखांपेक्षा जास्त परप्रांतीयांचा प्रवास

मुंबई : लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. दरम्यान, या सर्वाना घरी पोहचवण्याची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. राज्यात अडकलेल्या लाखो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पोहचवले जात आहे. मागच्या सहा दिवसांत एसटीने राज्याच्या विविध भागांतील १ लाख ६ हजार २४ परप्रांतिय मजूर, कामगारांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे. यासाठी एसटीच्या हजारो चालकांनी ७ हजार २२७ बसेसद्वारे ही सेवा दिली. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटक राज्यांच्या सीमेपर्यंत त्यांना सोडण्यात आल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here