नाणीज येथे आजपासून धावजेश्वर चषक भव्य स्पर्धा

0

◼️ उद्योजक किरण सामंत उदघाटक

नाणीज : येथे आजपासून ते पाच फेब्रुवारीपर्यंत भव्य धावजेश्वर चषक ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

HTML tutorial

त्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत मोठ्या संख्येने संघांनी सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे अध्यक्ष विनोद भागवत यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक – ५५५५५ व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक – ३३३३३व आकर्षक चषक आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अशी बक्षिसे ठेवली आहेत. ही स्पर्धा ऑनलाईन दिसणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रत्येक संघासाठी ४००० रुपये प्रवेश शुल्क आहे. प्रत्येक सामना कंपल्सरी चेस असणार आहे.
ही स्पर्धा आपल्या ग्रामदेवतेच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. आज त्या स्पर्धेस जवळजवळ १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
स्पर्धेचे उदघाटक महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. किरणशेठ उर्फ भैय्या शेठ सामंत आहेत.

२ व ३ या दिवशी एक ग्रामपंचायत सामने खेळविले जातील व ४ आणि ५ या दिवशी ओपन सामने खेळविले जातील. ५ तारखेला अंतिम सामना आहे. सर्व सामने येथील गुरवाडीतील आंब्याचा माळ येथे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:53 01-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here