पणजी : देशातील पहिले कोरोना मुक्त राज्य बनलेल्या गोव्यात बुधवारी एकाच दिवसात सात रुग्ण मिळाल्यानंतर गुरुवारी त्यात आणखी एकाची भर पडली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्याची माहिती दिली आहे. 8 वा रुग्ण गोमंतकीय खलाशी असून मुंबईत 14 दिवस क्वारंटाइन पूर्ण करून तो गोव्यात दाखल झाला आहे. मुंबई मध्ये त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता मात्र गोव्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ झाली आहे. विशेष म्हणजे सर्व रुग्ण गोव्याबाहेरुन गोव्यात आलेले आहेत.
