अर्थसंकल्पानंतर देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; काय झाले बदल?

0

नवी दिल्ली : भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती सरकारी तेल कंपन्या दररोज जाहीर करतात.

कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या आधारावर किंमती ठरवल्या जातात. बुधवारी म्हणजेच, 2 फेब्रुवारी 2022 रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत मोठी वाढ झाली आहे. जिथे एकीकडे, WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.85 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे आणि ती प्रति बॅरल 77.06 डॉलरवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, जर आपण ब्रेंट क्रूडबद्दल बोललो, तर ते 3.07 टक्क्यांनी घसरलं आहे आणि ते प्रति बॅरल 82.84 डॉलरवर व्यापार करत आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी आज सकाळी देशातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. या चार शहरांतील दर जुन्याच दरांवरच स्थिर आहेत. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत बऱ्याच काळापासून कोणताही मोठा बदल झालेला नाही. शेवटचा मोठा बदल 21 मे 2022 रोजी झाला होता, त्यावेळी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे उत्पादन शुल्क 8 रुपये आणि 6 रुपये प्रति लिटरने कमी केले होते.

राज्यात कोणत्या शहरात किती दर?

  • नागपूर : पेट्रोल 106.04 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  • पुणे : पेट्रोल105.84 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  • कोल्हापूर : पेट्रोल 106.47 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद : पेट्रोल 108 रुपये, डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  • परभणी : 109.45 रुपये प्रति लिटर, डिझेल 95.81 रुपये प्रति लिटर
  • नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर

देशांतील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील महानगरंपेट्रोल (प्रति लिटर)डिझेल (प्रति लिटर)
दिल्ली96.72 रुपये89.62 रुपये
मुंबई106.31 रुपये94.27 रुपये
कोलकाता106.03 रुपये92.76 रुपये
चेन्नई102.63 रुपये94.24 रुपये

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार बदलतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile Appतुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 02-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here