नवी दिल्ली : ईपीएफओमधून पैसे काढण्याबाबत २०२३ च्या अर्थसंकल्पात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याबाबत कर नियमात बदल केले आहेत. आता पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना ३० टक्क्यांऐवजी २० टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या घोषणांमध्ये, EPF मधून काढलेल्या रकमेवरील TDS देखील ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत समाविष्ट आहे. वास्तविक, जर खातेदाराने ५ वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. तर, ५ वर्षांनंतर कोणताही टीडीएस आकारला जात नाही. ज्या लोकांकडे टॅक्स पॅन कार्ड आहे त्यांना कमी टीडीएस भरावा लागतो. जर एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले नसेल तर त्याला ३०% पर्यंत टीडीएस भरावा लागत होता, आता ते २० टक्के करण्यात आले आहे.
खातेदार २ महिन्यांपासून पीएफमधून पूर्ण पैसे काढू शकतात. याशिवाय निवृत्तीनंतर किंवा वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही पैसे काढता येतात. जिथे कर्मचाऱ्याचा मृत्यू होतो, अशा परिस्थितीत त्याने नामनिर्देशित केलेली व्यक्ती पीएफ खात्यातून पैसे काढू शकते. याशिवाय इतरही अनेक कारणे सांगून तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता. मात्र, त्यांना काही अटीही घालण्यात आल्या आहेत. याशिवाय टीडीएससाठी १०,००० रुपयांची किमान थ्रेशोल्ड मर्यादा देखील बजेट २०२३ मध्ये काढून टाकण्यात आली आहे. लॉटरी आणि कोडींच्या बाबतीत १०,००० रुपयांच्या मर्यादेचा नियम लागू राहील. एका आर्थिक वर्षात एकूण १० हजारांपर्यंत टीडीएस कापला जाणार नाही. त्यानंतर टीडीएस कापला जाईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:20 02-02-2023
