रत्नागिरी : लॉकडाउनच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, म्हणून हातखंबा जि. प. गटाचे सदस्य पशुराम कदम यांच्या पुढाकाराने खानू प्राथमिक आरोग्य केंद्रात सोशल डिस्टन्सिंग व शासनाच्या नियमांचे पालन करीत रक्तदान शिबिर झाले. शिबिरात बांधिलकी जपत अनेक होतकरू युवकांनी रक्तदान केले. जिल्हा परिषद गटातील सर्व समाजसेवक, प्राथमिक आरोग्य कर्मचारी जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. खासदार विनायक राऊत व मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेतल्याची माहिती जि. प. सदस्य कदम यांनी दिली.
