मुंबई : देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं केंद्र सरकारनं कर्जरूपानं ताब्यात घ्यावं, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण केली होती. मात्र, या मागणीवरून पृथ्वीराज चव्हाण यांना ट्रोल करण्यात आलं. त्यावरून आता चव्हाण यांनी टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘देशातील सर्व देवस्थानांकडील सोनं ताब्यात घेण्याच्या माझ्या सूचनेमागचा हेतू शुद्ध आणि स्वच्छ होता. मात्र, भक्त मीडियातील काही विशिष्ट लोकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला व सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याविरोधात मी कायदेशीर कारवाईचं पाऊल उचलणार आहे,’ असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
