सर्वसामान्यांना मोठा झटका, ‘अमूल’चं दूध प्रतिलीटर ३ रुपयांनी महागलं

0

नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोनच दिवसात देशातील सर्वसामान्य जनतेला मोठा झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी दूध वितरक कंपनी ‘अमूल’नं आपल्या दूधाच्या किमतीत प्रतिलीटर ३ रुपयांची वाढ केली आहे.

HTML tutorial

अमूल कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात दरवाढीची माहिती दिली असून नवे दर आजपासूनच म्हणजे ३ फेब्रुवारीपासून लागू केले जाणार आहेत.

कंपनीच्या माहितीनुसार, आता ‘अमूल’ची अर्धालीटर दूधाची पिशवी २७ रुपयांना मिळणार आहे. तर एक लीटर दूधासाठी ५४ रुपये द्यावे लागणार आहेत. ‘अमूल गोल्ड’ म्हणजेच फुल क्रीम दूधाचं अर्धा लीटरचं पाकिट आता ३३ रुपयांना मिळणार आहे. तर एका लीटरसाठी ६६ रुपये मोजावे लागणार आहेत. अमूल गायीच्या दूधाची एका लीटरची किंमत आता ५६ रुपये इतकी झाली आहे. तर अर्धा लीटर दुधासाठी २८ रुपये द्यावे लागणार आहेत. तर म्हशीचं A2 दूध आता ७० रुपये प्रतिलीटर किमतीला मिळणार आहे.

असे आहेत अमूल दूधाचे नवे दर…

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 03-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here