गोव्यात विशेष रेल्वे गाड्यांना थांबा नको : प्रमोद सावंत

Goa Chief Minister Pramod Sawant address the media during a press conference ahead of IFFI 2019 inauguration in Goa on Tuesday. | DH Photo: Pushkar V

पणजी : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाला त्यांच्या राज्यात विशेष रेल्वे गाड्या थांबवू नयेत अशी मागणी केली आहे. कोरोना गोव्यात फैलावू नये यासाठी त्यांनी ही मागणी केली आहे. कोरोनामुक्त असलेल्या गोव्यात दोन दिवसांत कोरोनाचे 8 रुग्ण सापडले होते. हे सगळे रुग्ण गोव्याबाहेरून आलेले आहेत. त्यामुळेच सावंत यांनी ही मागणी केली आहे. 15 मे रोजी दिल्लीहून तिरुअनंतपुरमसाठी विशेष ट्रेन सोडण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे. या गाडीला गोव्यामध्ये थांबा देऊ नये अशी सावंत यांनी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले या ट्रेनने प्रवास करणाऱ्या 720 लोकांना गोव्यामध्ये उतरायचे आहे. त्यांनी गोव्यासाठीची तिकीटे आरक्षित केली आहे. यातली फार थोडी मंडळी ही मूळची गोव्याची रहिवासी आहे. प्रमोद सावंत म्हणाले की ही मंडळी गोव्यामध्ये उतरल्यानंतर काय होईल याची आम्हाला चिंता आहे. त्यांची तपासणी होईल, त्यांना घरात होम क्वारंटाईन केले जाईल, मात्र ते तसं करतील याची आम्हाला खात्री नाही. त्यामुळे या प्रवाशांना गोव्यात उतरूनच देऊ नये असं सावंत म्हणाले आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here