रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांत अग्निरोधक आणि फायर बॉल

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे आगीपासून सुरक्षित झाली आहेत. जिल्ह्यात २६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३७८ उपकेंद्रे, तर ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत अग्निरोधक आणि फायर बॉल बसविण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्यकेंद्रांचे, उपकेंद्रांचे फायर ऑडिट झाले. त्यानंतर त्या त्या ठिकाणी एक्सएल अग्निशामक बसवण्यात यावेत, अशा सूचना शासनाकडून आल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे अंदाजपत्रक तयार करुन पाठवले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून ३८ लाखांचाच निधी मंजूर करण्यात आला होता. याच निधीमधून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांचे फायर ऑडिट करण्यात आले. तसेच फायर एस्टिंग्विशर आणि फायर बॉलदेखील देण्यात आले. ते कार्यान्वित झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:56 03-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here