रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशनतर्फे हातिस उरूसादरम्यान दुचाकीची मोफत दुरूस्ती, पंक्चर सेवा

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा “पीर बाबर शेख” उरूस (यात्रा) हातिस, या यात्रेनिमित्त भाविक दुचाकी घेऊन मोठ्या प्रमाणात दर्शनाकरिता येत असतात. काही जण मित्रांसोबत तर काही भक्त आपल्या कुटुंबांसोबत दुचाकी वरून येतात.

दुचाकी (टू-व्हिलर) वरून येत असताना रात्रीच्या वेळी दुचाकी नादुरूस्त झाल्यास अथवा पंक्चर झाल्यास भाविकांच्या डोळ्यासमोर मोठे संकंट उभे रहाते. अशा रात्रीच्या वेळी शहरापासून दूर असलेल्या ठिकाणी भाविकांची गाडी कोण दुरुस्त करणार. हि आर्त हाक भक्तांच्या मुखातून आम्हाला मिळाली. आणि तेव्हापासून म्हणजेच “२००६” साला पासून आम्ही प्रत्येक यात्रेला “रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशन” च्या वतीने रात्रीच्या वेळी दुचाकी वाहनांची मोफत दुरूस्ती व पंक्चर सेवा कॅम्प करण्याचा उपक्रम राबवत आहेत.

या मध्ये ४५/५० मेकॅनिक ची टीम संपूर्ण मार्गावर से वे करिता तयार असते. सोबत देवस्थानाला दर्गाच्या पाठीमागे पार्किंग करिता सहकार्य करते.पीर बाबरशेख बाबाचा दुचाकी स्वार भक्त आपल्या घरी सुखाने जावा हा आमच्या असोसिएशन चा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

या यात्रेला रत्नागिरी जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणा व पीर बाबर शेख ग्रामविकास मंडळ,यात्रा यशस्वी होण्यासाठी व सुरळीत पारपडण्यासाठी झटत असते. या मध्ये आमच्या असोसिएशन चा खारीचा वाटा. ही सेवा रविवार दिनांक ५/२/२०२३ दुपार पासून सोमवार ६/२/२०२३ सकाळपर्यंत असणार आहे.

भाविकांच्या दुचाकी गाडीला काही बिघाड झाल्यास अथवा गाडी पंक्चर झाल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. ९२२६५९७४७८, ७३५०४५७०४०, ८१४९२६१०८५, ९३२५५०१९४९, ९४०४७६३५११, ९८३४८८४७१५, ७६६६७८४०८३, ८४२५९७३७५६, ९६६५१४८८४१, ९८६००२६५९९, ९८२२१६१८७५, ९२८४८०८९३१.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:39 03-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here