नेवरे येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यास मंगळवारपासून प्रारंभ

0

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे लावगणवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

HTML tutorial

यानिमित्ताने दि.७ ते १३ फेब्रुवारी अखेर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ७ फेब्रुवारीपासून कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे.

मंगळवार दि.७ फेब्रुवारी रोजी काकड आरती, पंचामृती पूजा, अभिषेक, दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदीकुंकू व रात्री १०.३० वाजता श्री गजानन महाराज नमन मंडळ नेवरे लावगणवाडी यांचे नमन होणार आहे. बुधवार दि.८ फेब्रुवारी रोजी आरती, श्रींची पूजा व अभिषेक, त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक- स्थानिक देवस्थान भेट त्यानंतर १०.३० वाजात पालखी लांजा तालुक्यातील गवाणे येथील सुर्यकांत करंबले यांच्याकडे प्रस्थान करणार आहे. तेथे रात्री मुक्काम होईल. गुरूवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता श्रींची पूजा, श्री अक्कलकोट स्वामी सेवा केंद्र येथे पालखीचे आगमन होईल. नेवरे फाटा येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे पालखीचा मुक्काम राहणार असून भजनाचा कार्यक्रमही होणार आहे. शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची पूजा, पालखी मिरवणूक (नेवरे लावगणवाडी), सायंकाळी संजय हर्षे यांचे घरी पालखी मुक्काम राहणार आहे.

शनिवार दि.११ फेब्रुवारी रोजी श्रींची पूजा, पालची मिरवणूक, भजन, आरती हाणेार आहे. रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी काकड आरती, पंचामृत पूजा व अभिषेक, मूर्ती वर्धापन दिन, भक्तनिवास भूमीपूजन सोहळा, महाप्रसाद व त्यानंतर ह.भ.प महेश सरदेसाई यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार दि.१३ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० वाजता श्री गजान विजय ग्रंथाचे पारायणास प्रारंभ होणार आहे. सकाळी महाअभिषेक, त्यानंतर महाप्रसाद, भजन, बक्षिस वितरण सोहळा, व रात्री श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ, देवरूख कोल्हेवाडीतर्फे नमन सादर करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 03-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here