रत्नागिरी : रत्नागिरीच्या सिटी सर्वे खात्यात अनेक वर्षे सेवा बजावणारे सदानंद शंकर मयेकर यांचे काही वेळापूर्वी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८० होते. आजाराने त्यांची प्रकृती खालावली होती आणि त्यातच आज सायंकाळी त्यांचे निधन झाले. रत्नागिरी शहरातील मांडवी येथे त्यांचे घर होते. याच ठिकाणाहून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून आज रात्री दानशूर भागोजिशेठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सदानंद मयेकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
7:01 PM 03-Feb-23
📰➖♾️➖♾️➖♾️➖📰

