महाराष्ट्रातील सर्वात उंच ‘बाण’ सुळका रत्नागिरीतील गिर्यारोहकांनी केला सर

0

रत्नागिरी : गिर्यारोहणासाठी उच्च अवघड श्रेणीत मोडणारा महाराष्ट्रातील सर्वात उंच व कठीण असलेला साम्रद (जि. अहमदनगर) “गावाजवळील ‘बाण सुळका रत्नागिरीच्या जिद्दी गिर्यारोहकाच्या पथकाने सर केला.

वेगाचा वारा, अधूनमधून मधमाश्यांचा हल्ला, वरून कोसळणारे बारीक दगड अशा संकटांवर मात करत अरविंद नवेले, प्रसाद शिगवण या दोघांनी ‘बाण’ सुळक्याची चढाई दोन दिवसात यशस्वी केली. आतापर्यंत राज्यातील मोजक्याच पथकांनी हे धाडस केले आहे.

साम्रद येथील सांधण दरीजवळ ७१० फूट उंचीचा बाण दिमाखात उभा आहे. हा सुळका सर करण्यासाठी जिद्दीच्या नऊ शिलेदारांचे नेतृत्व अरविंद नवेले यांनी केले. जिद्दीची टीम २८ जानेवारीला साम्रदला पोहचली. अवघड वाटा, पाण्याची कमतरता, पाठीमागे क्लाइंबिंग साहित्याच्या बॅगा आणि अर्ध्या रस्त्यात पडलेला अंधार यामुळे भानसोडक्याचा प्रवास खडतर ठरणार याची प्रचिती आधीच आली. बाण सुळका अति दुर्गम भाग अत्यंत खडतर चढाई यामुळे सह्याद्रीतील कठीण जोखीमयुक्त आणि उच्च अवघड श्रेणीतील म्हणून ओळखला जातो.

जिद्दीची टीमने 29 जानेवारीला सकाळी साडेसहा वाजता अरविंद नवले यांनी आणि त्यांच्या मागोमाग प्रसाद शिगवण यांनी चढाईला सुरुवात केली. शारीरिक आणि मानसिक कसोटीचा सामना करत या दोघांनी संध्याकाळपर्यंत दुसऱ्या स्टेशन पर्यंत मजल मारली. यावेळी संपर्क व्यवस्था सतीश आकाश अमरेश यांनी सांभाळली दुसऱ्या दिवशी 30 जानेवारीला सकाळी 6.30 वाजता जिद्दी टीमने नव्या जोमाने चढाईला प्रारंभ केला. आधीच दोन स्टेशन पर्यंत रोप लावल्याने अरविंद आणि प्रसाद यांनी दुसऱ्या स्टेशन पासून तिसऱ्या स्टेशनकडे कुच केली. पहिल्या व दुसऱ्या स्टेशनवर आकाश नाईक सतीश पटवर्धन होते वाण सुळका सायंकाळी सर केला. या मोहिमेचे फोटो व्हिडिओ आणि ड्रोन शूटिंग सुमुख गोठीवरेकर यांनी केले.

या मोहिमेमध्ये अरविंद नवले, प्रसाद शिगवणसह सतीश पटवर्धन, आकाश नाईक, अमरेश ठाकूर, देसाई, ओंकार सागवेकर, सुमुख कोठीवरेकर, मिलिंद गोरे, नेहा घाणेकर दिग्विजय लाड यांचा सहभाग होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 04-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here