रत्नागिरी : शहरातील पानपट्टी धारकांना भाजपा कार्यालयात बोलावून सोशल डीस्टनसिंगचे पालन करत भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी संवाद साधला. ८० पानपट्टीधारक व तत्सम व्यावसायिकांना लॉकडाऊनच्या या कठीण कालखंडात आस्तेवाईकपणे आठवण ठेवत ८ दिवसांसाठी शिधा वाटप करण्यात आले. तसेच वैयक्तिकरित्या त्यांच्याजवळ संवाद साधत लॉकडाऊन नंतर व्यवसायासाठी काही मदत उपलब्ध करून देता येईल का? याबाबतीतही चर्चा करण्यात आली. पानपट्टीधारक हा समाज्यातील महत्वपूर्ण दुवा ठरू शकतो असा घटक आहे आणि या घटकाचे मदतीसाठी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी रत्नागिरी भाजपा सदैव आपल्या बरोबर असेल असे सांगत भाजपा कार्यालय तुमचेसाठी सदैव खुले आहे, तुमचे प्रश्न, अडचणी घेऊन तुम्ही कार्यालयात या तुमचे स्वागत होईल. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेल्या संदेशा बरहुकुम समाज्यातील गरजू वर्गापर्यंत मदतीचा ओघ पोचवण्यासाठी भा.ज.पा. काम करत आहे, असे अॅड. पटवर्धन म्हणाले. या प्रसंगी शहराध्यक्ष सचिन करमरकर, सरचिटणीस बाबू सुळे, नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, तालुकाध्यक्ष चवंडे, बिपीन शिवलकर, प्र.का. सदस्य सचिन वहाळकर आदी उपस्थित होते.
