पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी

0

नवी दिल्ली : गुरेजमधील तुलेल परिसरातील दोन गावांमध्ये हिमस्खलन झालं आहे. सततच्या बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिमस्खलनामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत.

HTML tutorial

यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत.

गुरेज सेक्टरमध्ये शुक्रवारी हिमस्खलन झाल्यामुळे नद्द्यांच्या किशनगंगा नदीच्या प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे या परिसरात जलसंकट निर्माण झालं आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या गुरेझमधील तुलेल परिसरात हिमवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. येथील दोन गावांमध्ये हिमस्खलन झाले आहे. या हिमस्खलनामुळे किशनगंगा नदीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.

त्यामुळे नदीच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. हिमस्खलनामुळे येथील विजिर्थल आणि नीरू गावात पाण्याचा प्रवाह रोखला गेला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुग्रान तुलेलमध्ये हिमस्खलनामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून या या भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्रशासनाने नागरिकांना सर्तकतेचे आवाहन केलं आहे. हवामान सुधारेपर्यंत प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्यास आणि किशनगंगा, पर्वत किंवा हिमस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणांपासून दूर राहण्यास सांगितलं आहे.

पर्वतीय प्रदेशांमध्ये हिमवर्षाव सुरुच आहे. जम्मू आणि काश्मीरसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही सतत बर्फवृष्टी सुरू आहे.

हिमाचल प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे.

हिमवृष्टीनंतर हिमाचल प्रदेशमधील 208 रस्त्यांवरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:21 04-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here