ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे मोफत तपासणी शिबिर

0

चिपळूण : महिलांमध्ये आढळून येणारे कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता चिपळूण येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

HTML tutorial

दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत हे शिबिर होणार आहे. शिबिराच्या माध्यमातून स्तनाचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येईल. तसेच ३५ वर्षांवरील अधिक महिलांची मोफत मॅमोग्राफी तपासणी करणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर येथे एकमेव मेमोग्राफी सेंटर आहे. या शिबिरात स्त्री – कर्करोगतज्ज्ञ डॉ. तेजल गोरासिया आणि डॉ. आत्माराम चौधरी महिलांची वैद्यकीय तपासणी करतील. गर्भाशय, स्तनांशी निगडित महिलांना त्रास जाणवत असेल तर त्याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नये.

अचानक रक्तपांढरे होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर रक्तस्राव होणे, स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटणे, पोट जड वाटणे, न पचलेले अन्न उलटणे, तोंडात न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे, लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव, बध्दकोष्ठतेची तक्रार, काखेत, जांघेत, गळ्यात कडक गाठींचे अवधाण येणे अशी लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी तत्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली संपूर्ण तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे करण्यात येत आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 04-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here