आंगणेवाडी यात्रेत लोटला भक्तांचा महासागर

0

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यत आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला शनिवारी सुरुवात झाली आहे.

देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. मध्यरात्री आंगणे कुटुंबीयांनी प्रथम पूजा केल्यानंतर सर्वसामान्य भाविकांना दर्शन सुरू करण्यात आले. पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन सुरु झाले.

मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी यंदा नऊ रांगातून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसामान्य रांगा, अतिमहनीय व्यक्तींसाठी रांगा तसेच अपंगांसाठीसुदधा विशेष रांग सुद्धा करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात काहीशी गर्दी होती परंतु जसजसे ऊन कडक होऊ लागल्यानंतर गर्दी गर्दीचा ओघ काहीसा कमी झाला. पण सायंकाळनंतर गर्दी वाढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील भराडी मातेचे दर्शन घेतले. तसेच सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण देखील दर्शन घेतले.

सकाळपासून आमदार सुनील प्रभू, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार आशिष शेलार, आमदार वैभव नाईक, प्रताप सरनाईक, विनोद तावडे अशा मान्यवरांनी भराडी मातेचं दर्शन घेतलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 06-02-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here